मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 23

हा अध्याय या भागाचा आहे: Boek I

De HEER is mijn herder

1परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. 2तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. 3तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. 4मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. 5तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे. 6खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

Statenvertaling (1637) · World English Bible (2000) · इंडियन रीवाइज्ड वर्जन (2019): © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, bridgeconn.com, via eBible.org. CC BY-SA 4.0; notes and headings omitted. · स्रोत आणि परवाने

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.