मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 128

हा अध्याय या भागाचा आहे: Boek V

1जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे. 2तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल. 3तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील. 4होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल. 5परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो. 6तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलावर शांती असो.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.