मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 56

हा अध्याय या भागाचा आहे: Boek II

1हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो; दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो. 2माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात; कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत. 3मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन. 4मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील? 5दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात. 6ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात. 7त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण. 8तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का? 9मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे. 10मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. 11मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील? 12हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे; मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन. 13कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे; तू माझे पाय पडण्यापासून राखले, यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.