मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 61

हा अध्याय या भागाचा आहे: Boek II

1हे देवा, माझी आरोळी ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. 2जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने. 3कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस. 4मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन. 5कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे. 6तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत. 7मी देवासमोर सर्वकाळ राहो; तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील. 8मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.