मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 121

हा अध्याय या भागाचा आहे: Boek V

1मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल? 2परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते. 3तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही. 4पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. 5परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. 6दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. 7परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील. 8परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.