मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 46

हा अध्याय या भागाचा आहे: Boek II

1देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो. 2म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही. 3जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही. 4तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात. 5देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील. 6राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल. 7सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे. 8या, परमेश्वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे. 9तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; तो रथ जाळून टाकतो. 10शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन. 11सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.