मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 52

हा अध्याय या भागाचा आहे: Boek II

1हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस? देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते. 2अरे कपटाने कार्य करणाऱ्या, तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी नाशाची योजना करते. 3तुला चांगल्यापेक्षा वाईटाची, आणि प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा असत्याची अधिक आवड आहे. 4तू कपटी जीभे, तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात. 5त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील; तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील. 6नितीमानसुद्धा ते पाहतील आणि घाबरतील; ते त्याच्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील, 7पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला, आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले. 8पण मी तर देवाच्या घरात हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; माझा देवाच्या कराराच्या विश्वसनीयतेवर सदासर्वकाळ आणि कायम भरवसा आहे. 9कारण ज्या गोष्टी तू केल्या आहेत, त्यासाठी मी तुझ्या विश्वासणाऱ्यांच्या समक्षेत सर्वकाळ तुझे उपकार मानीन. आणि तुझ्या नावात आशा ठेवली आहे कारण ते चांगले आहे.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.