मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 54

हा अध्याय या भागाचा आहे: Boek II

1हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर. 2हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे. 3कारण माझ्याविरूद्ध परके उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही. 4पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे. 5तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर. 6मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे. 7कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.