मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 114

हा अध्याय या भागाचा आहे: Boek V

1जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले, 2तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले. 3समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली. 4पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या. 5हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस? 6पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता? 7हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप. 8तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.