मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 98

हा अध्याय या भागाचा आहे: Boek IV

1परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे. 2परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे. 3त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. 4अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा. 5परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा. 6कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा. 7समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. 8नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत. 9परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.