मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 123

हा अध्याय या भागाचा आहे: Boek V

1स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो. 2पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात. 3हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत. 4सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.