मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 85

हा अध्याय या भागाचा आहे: Boek III

1हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस. 2तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत. 3तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस. 4हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर. 5सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय? 6तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का? 7हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; तू कबूल केलेले तारण आम्हास दे. 8परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये. 9खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे. 10दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे. 11पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे. 12जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल. 13त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.