मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 24

हा अध्याय या भागाचा आहे: Boek I

1भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत. 2कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, आणि जलांवर त्याने ती स्थापली. 3परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? 4ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही. 5तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल. 6हिच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते. 7अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. 8गौरवशाली राजा कोण आहे? तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे. 9वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. 10तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.