मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 120

हा अध्याय या भागाचा आहे: Boek V

1माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले. 2हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव. 3हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार? 4तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील. 5मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो. 6शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे. 7मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.