मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 63

हा अध्याय या भागाचा आहे: Boek II

1हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे. 2म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे. 3कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; माझे ओठ तुझी स्तुती करतील. 4म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन. 5माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील. 6मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो. 7कारण तू माझे सहाय्य आहे, आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे. 8माझा जीव तुला चिकटून राहतो; तुझा उजवा हात मला आधार देतो. 9पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील. 10त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल; त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील. 11परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल; जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल, पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

Statenvertaling (1637) · World English Bible (2000) · इंडियन रीवाइज्ड वर्जन (2019): © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, bridgeconn.com, via eBible.org. CC BY-SA 4.0; notes and headings omitted. · स्रोत आणि परवाने

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.