मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

स्तोत्रसंहिता 150

हा अध्याय या भागाचा आहे: Boek V

1परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा. 2त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा. 3शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा. 4डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा. 5जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा. 6प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

Statenvertaling (1637) · World English Bible (2000) · इंडियन रीवाइज्ड वर्जन (2019): © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, bridgeconn.com, via eBible.org. CC BY-SA 4.0; notes and headings omitted. · स्रोत आणि परवाने

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.