मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

ईयोब 8

हा अध्याय या भागाचा आहे: Gesprekken met de vrienden

1नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले आणि म्हणाला, 2“तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे किती वेळेपर्यंत उडत राहतील. 3देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय? 4तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून देवाने त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा केली. 5परंतु आता तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर. 6तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल. 7जरी तुझी सुरुवात लहान असली, तरी तुझी अंतिम स्थिती अधिक मोठी असेल. 8मी तुला विनंती करतो वडिलांच्या वेळेची माहिती विचार, त्यांनी जो शोध लावला तो तुझ्यासाठी लागू करून घे. 9आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत आणि काहीच माहित नाही, कारण छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस आहेत. 10ते काय तुला शिकविणार आणि सांगणार नाहीत काय? काय ते त्याच्या अंतकरणातून बोलणार नाही का? 11लव्हाळी चिखलाशिवाय उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का? 12ते अजूनही हिरवे आहेत आणि कापले नाही, ते दुसऱ्या झाडापेक्षा लवकर सुकून जातात. 13म्हणून नास्तिक मनुष्याची आशा, जे सर्व देवाला विसरतात त्याचा मार्ग सुद्धा नष्ट होईल. 14ज्याचा भरवसा नष्ट होतो. आणि ज्याचा विश्वास कोळ्याच्या जाळ्यासारखा तकलादु आहे. 15तो आपल्या घरावर टेकला असता परंतू ते त्यास आधार देऊ शकणार नाही, त्याने ते पकडून धरले असता ते स्थिर राहायचे नाही. 16तो सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा हिरवागार आहे, तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात. 17तिची मुळे खडकाभोवती आवळली जातात आणि खडकावरही उगवण्याचा प्रयत्न करतात. 18परंतु जर हा व्यक्ती त्या जागेवरून हलवला गेला तर तो नष्ट होतो, मग ती जागा त्यास नाकारुन म्हणेल ‘मी तुला कधी पाहिले नाही.’ 19पाहा अशा रीतीने वागणाऱ्या वक्तीबद्दल हाच आनंद आहे की तिच्याच जागी धुळीतून दुसरे उगवतील. 20पाहा, देव निरागस लोकांस सोडून देत नाही. तसेच तो वाईट मनुष्यांना मदतही करत नाही. 21देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदाने ओरडतील! 22जे तुझा द्वेष करतात ते लज्जेची वस्त्रे घालतील, दुष्ट मनुष्यांची राहूटी नष्ट होइल.”

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.