मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

ईयोब 27

हा अध्याय या भागाचा आहे: Gesprekken met de vrienden

1नंतर ईयोब ने आपले बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाला, 2“जसे देव जिवंत आहे, तो माझ्याबाबतीत अन्यायी होता, त्या सर्वशक्तिमान देवाने माझ्या जीवाला दु:ख दिले आहे, 3जोपर्यंत माझ्यात जीव आहे आणि देवाचा जिवंत श्वास माझ्या नाकात आहे तोपर्यंत, 4माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत आणि माझी जीभ खोटे सांगणार नाही. 5तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही. मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन. 6मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन. चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही. 7माझे शत्रू दुष्टासारखे होवो, अनितीमान मनुष्यासारखे ते माझ्यावर उठो. 8कारण देवविरहीत राहणाऱ्यांना देव जीवनातून छेदतो तर त्यांची काय आशा आहे, त्याचा जीव त्याने काढून घेतला म्हणजे त्यास काय आशा आहे? 9देव त्याची आरोळी ऐकेल काय? जेव्हा त्याच्यावर संकटे येतील, 10तो सर्वशक्तिमानाच्या ठायी आनंद मानेल काय? आणि तो देवाला सर्वदा हाक मारेल काय? 11मी तुम्हास देवाच्या हाताविषयी शिकविल, सर्वशक्तिमानाच्या योजना मी तुमच्यापासून लपवणार नाही. 12पाहा, तुम्ही सर्वांनी हे पाहिले आहे, मग तुम्ही असे निरर्थक का बोलता? 13देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती. आणि सर्वशक्तिमानाकडून जुलम्यास हेच वतन मिळते. 14त्यास खूप मुले असतील परंतु त्याची मुले तलवारीने मरतील, दुष्ट मनुष्याच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही. 15राहीलेली सर्व मुले साथीने मरतील, आणि त्यांच्या विधवा विलाप करणार नाहीत. 16दुष्ट मनुष्यास इतकी चांदी मिळेल की ती त्यास मातीमोल वाटेल, त्यास इतके कपडे मिळतील की ते त्यास मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील. 17जरी तो कपडे करील ते धार्मिक अंगावर घालतील, निर्दोष त्याची चांदी त्यांच्यामध्ये वाटून घेतील. 18तो त्याचे घर कोळ्यासारखे बांधतो, रखवालदाराने बांधलेल्या झोपडीसारखे ते असते. 19तो श्रीमंत स्थितीत अंग टाकतो, परंतू सर्वदा असे राहणार नाही, तो उघडून बघेल तेव्हा सर्व गेलेले असेल. 20भय त्यास पाण्याप्रमाणे घेवून जाईल, वादळ त्यास रात्री घेवून जाईल. 21पूर्वेचा वारा त्यास वाहून नेईल आणि तो जाईल वादळ त्यास त्याच्या घरातून उडवून लावेल. 22तो वारा त्यास फेकून देईल आणि थांबणार नाही, तो त्याच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करील. 23तेव्हा लोक टाळ्या वाजवतील आणि त्याची थट्टा करतील, त्याच्या ठिकाणातून त्यास पळवून लावतील.”

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.