मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

ईयोब 16

हा अध्याय या भागाचा आहे: Gesprekken met de vrienden

1नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, 2“या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत, तुम्ही सर्व वायफळ सांत्वनकर्ते आहात. 3तुमची वायफळ शब्द कधीही संपत नाहीत. तुम्हास काय झाले आहे कि, तुम्ही याप्रमाणे उत्तर देता? 4जर तुमच्यासारखे मलाही बोलता आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात तेच मीही म्हणू शकलो असतो. मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो. 5अहो मी तुम्हास माझ्या मुखाने मी धीर दिला असता. आणि माझ्या ओठाने तुमचे सांत्वन केले असते. 6परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. पण मी बोललो नाहीतर माझ्या यातना कमी कशा होणार? 7खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस. 8तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांस वाटते. 9देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात. 10लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात. 11देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर मनुष्यांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे. 12मी अगदी मजेत होतो, पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला. 13त्याचे धनुर्धारी मला घेरतात. तो माझ्या कंबरेत बाण सोडतो तो दया दाखवीत नाही. तो माझे पित्ताशय धरतीवर रिकामे करतो. 14देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करून येतो. 15मी फार दु:खी आहे म्हणून मी दु:खाचे कपडे घालतो. मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते. 16रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे. माझ्या पापण्यांवर मरणाची छाया आहे. 17तरीही माझ्या हातून कोणात्याही प्रकारची हिंसा झाली नाही, आणि माझ्या प्रार्थना शुध्द आहेत. तरी असे झाले. 18हे धरती, माझे रक्त लपवू नकोस. माझ्या रडण्याला विश्रांतीस्थान देऊ नकोस. 19स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल. जो माझी त्या सर्वसमर्थासमोर हमी घेईल. 20माझे मित्र माझा उपहास करतात, पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात. 21जशी एखादी व्यक्ती आपल्या मित्रासाठी वादविवाद करते तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो. 22जेव्हा काही वर्ष जातील, तेव्हा मी पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे.”

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.