मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

ईयोब 13

हा अध्याय या भागाचा आहे: Gesprekken met de vrienden

1पाहा, “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, माझ्या कानांनी हे ऐकले आहे व त्या सर्व गोष्टी मला समजतात. 2तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे, मी तुमच्याहून काही कमी नाही. 3मला सर्वशक्तिमानाशी बोलायचे आहे, मला देवाबरोबर माझ्या कारणाविषयी बोलायचे आहे. 4तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात. 5अहो, तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे. ती तुम्हास करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल. 6आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या, माझ्या ओठाची फिर्याद ऐका. 7तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का? त्याच्या करीता तुम्ही कपटाचे भाषण करणार काय? 8तुम्ही माझ्याविरुध्द देवाचा बचाव करीत आहात का? तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत तो देव आहे म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात. 9जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर, त्यास काहीतरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांस जसे मूर्ख बनवू शकता तसेच देवालाही बनवू शकाल असे तुम्हास वाटते का? 10तुम्ही जर एखादा मनुष्य महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हास माहीत आहे का? 11देवाचे मोठेपण तुम्हास घाबरवत नाही काय? त्याचा धाक तुम्हास वाटणार नाही काय? 12तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत, तुमची तटबंदी ही मातीपासून बनलेली आहे. 13आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या! माझे जे काही होईल ते मला मान्य आहे. 14मी माझे मांस माझाच दातात धरेन मी माझ्याच हातात माझेच जीवन धरीन? 15पहा, जरी त्याने मला मारुन टाकले, तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवीन. असे असले तरी, मी त्याच्यासमोर माझा मार्गांची मांडणी करीन. 16कारण ढोंगी त्याच्या पुढे येणार नाही हे माझे तारण होईल. 17देवा, तू माझे सांगणे काळजी पूर्वक ऐक, माझी घोषणा तुझा कानी येऊदे. 18आता पहा, मी माझ्या बचावाला सिध्द झालो आहे. मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन. मला माहीत आहे की मी निष्पाप आहे हे मी दाखवून देईन. 19न्यायालयात माझ्या विरुध वादविवाद करेल असा कोण आहे? आणि माझी चुक आहे हे तू येऊन सिद्ध केलेस म्हणून मी गप्प बसेन व प्राण त्यागेन. 20देवा, तू माझासाठी फक्त दोन गोष्टी कर, आणि त्यानतर तुझ्या मुखापासून मी स्वत:ला लपवणार नाही. 21माझ्या विरुध असलेला तुझा हात कडून घे, आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव. 22नंतर मला हाक मार. मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे. 23मी किती पापे केली आहेत? मी काय चुका केल्या आहेत? तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव. 24तू आपले मुख माझ्या पासून का लपवत आहेस? आणि मला तुझ्या शत्रूसारखे का वागवीत आहेस? 25मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे. तू गवताच्या एका काडीचा पिच्छा पुरवितोस का? 26तू माझ्याविरुध्द फार कटू गोष्टी लिहिल्या. मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस. 27तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस, माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस. 28म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे.”

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.