मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

होशेय 5

हा अध्याय या भागाचा आहे: Aanklacht en liefde

1याजकांनो! हे ऐका, इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे, हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे तुम्ही मिस्पावर पाश आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात. 2बंडखोर खोल कत्तलीत राहतात पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन. 3एफ्राईम मला माहित आहे आणि इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही. एफ्राईम तू एका वेश्येसारखा झाला आहेस, इस्राएल अशुद्ध झाला आहे. 4त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही, कारण त्यामध्ये व्यभिचारी आत्मा राहतो; आणि ते आपला देव परमेश्वर यास ओळखत नाहीत. 5इस्राएलाचा गर्व त्याचाच विरोधात साक्ष देतो, इस्राएल व एफ्राईम आपल्या अपराधात ठेचाळणार, आणि यहूदा सुध्दा त्यांच्या सोबत अडखळेल. 6ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे व गुरे घेऊन करतील, परंतू तो त्यांना सापडणार नाही, कारण त्याने त्यांचा त्याग केला आहे. 7ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले; कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन. 8गिबात शिंग आणि रामात तुतारी फुंका; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ अविन येथे करा. 9शासनाच्या दिवशी एफ्राईम नाश पावेल, इस्राएलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळवली आहे. 10यहूदाचे पुढारी सिमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत, मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार. 11एफ्राईमाचा चुराडा झाला आहे, न्यायामध्ये त्याचा चुराडा झाला आहे, कारण त्याने मनापासून मूर्त्यांना दंडवत करण्याचे ठरवले आहे. 12ह्यास्तव मी एफ्राईमाला कसर आणि यहूदाच्या घराण्यास किडीसारखा होईन. 13जेव्हा एफ्राईमाने आपला रोग आणि यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला, आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला; पण तो त्यास आरोग्य देऊन त्यांची जखम बरी करू शकला नाही. 14हयास्तव मी एफ्राईमास सिंह आणि यहूदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी, हो मीच त्यांना फाडून टाकीन व घेऊन जाईन, आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल. 15मी आपल्या स्थानी परत जाईन, जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत; जोपर्यंत ते आपल्या दु:खात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.