मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

होशेय 11

हा अध्याय या भागाचा आहे: Aanklacht en liefde

1जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले, आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले. 2त्यांना जेवढे बोलविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात ते बआलास बली आणि मुर्तीस धूप जाळत. 3तरी तो मीच ज्याने एफ्राईमास चालणे शिकविले तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो. 4मी त्यांना मानवता आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतो आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले. 5ते मिसरात परत येणार काय? अश्शूर त्यावर राज्य करणार काय? कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात? 6त्यांच्या नगरावर तलवार चालेल आणि ती त्याच्या दाराचे अडसर नष्ट करील, त्यांचा नाश त्यांच्या स्वत:च्या योजनांमुळे होईल. 7माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही. 8हे एफ्राईमे, मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला, मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करु? मी तुला सबोयिमासारखे कसे करु? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे. 9मी माझा भयानक राग अमलात आणणार नाही मी एफ्राईमाचा पुन्हा नाश करणार नाही कारण मी देव आहे आणि मनुष्य नाही तुमच्यामध्ये असणारा मी पवित्र आहे मी क्रोधाने येणार नाही. 10ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वर सिंहासारखी गर्जना करेन मी खरोखर गर्जेन आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील. 11ते मिसरातून पक्षासारखे आणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतील मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो. 12एफ्राईम मला लबाडीने आणि इस्राएलचे घराणे कपटाने वेढले, पण यहूदा आतापर्यंत देवाबरोबर, जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.