मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

होशेय 3

हा अध्याय या भागाचा आहे: Het huwelijk als beeld

1परमेश्वर मला म्हणाला, परत जा, आणि अशा स्त्रीवर प्रेम कर जी दुराचारी असूनही आपल्या पतीस प्रिय आहे. तिच्यावर प्रेम कर जसे मी इस्राएल लोकांवर करतो जरी ते इतर देवतांकडे वळले आणि त्यांना मनुक्याची ढेप प्रिय वाटली. 2म्हणून मी पंधरा चांदीचे तुकडे व दिड मण जव देऊन तिला माझ्यासाठी विकत घेतले. 3मी तिला म्हणालो, पुष्कळ दिवस तू माझ्यासोबत राहा; यापुढे तू वेश्या नाहीस किंवा परपुरुषाची नाहीस, त्याचप्रकारे मी पण तुझ्याशी वागेन. 4कारण इस्राएलचे लोक बरेच दिवस राजा, सरदार, बलीदान, दगडी खांब, एफोद आणि गृहदेवता ह्यांवाचून राहतील. 5नंतर इस्राएलाचे लोक परत येतील व आपल्या देव परमेश्वर आणि राजा दावीद यांना शोधतील आणि शेवटच्या दिवसात, ते परमेश्वराच्या समोर त्याच्या चांगुलपणात भितीने कापत येतील.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.