मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

1 इतिहास 25

हा अध्याय या भागाचा आहे: David

1दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी: 2आसाफाच्या वंशातले: जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते. 3यदूथूनाचे वंशज: गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे. 4हेमानाचे वंशज: बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ. 5हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले. 6हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती. 7ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते. 8त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली. 9तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले. 10तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले. 11चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले. 12पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण. 13सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. 14सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. 15यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण. 16नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण. 17दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. 18अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण. 19बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण. 20तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. 21चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. 22पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा. 23सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. 24सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. 25अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. 26एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण. 27विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. 28एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. 29बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. 30तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. 31चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.