मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

1 इतिहास 24

हा अध्याय या भागाचा आहे: David

1अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार. 2पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले. 3दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली. 4इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते. 5दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते. 6आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई. 7पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची, 8तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची, 9पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची, 10सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची. 11नववी येशूवाची, दहावी शकन्याची, 12अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची 13तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची, 14पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची. 15सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची, 16एकोणीसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची, 17एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची, 18तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची. 19परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले. 20लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: अम्रामच्या वंशातील शूबाएल; शूबाएलचे वंशज: यहदाया. 21रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य. 22इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ. 23हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम. 24उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर. 25मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या. 26मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो. 27मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री. 28महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते. 29कीशाचे वंशज: यरहमेल. 30महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र. हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली. 31राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.