मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

यहोशवा 16

हा अध्याय या भागाचा आहे: Het land verdeeld

1योसेफ वंशाला नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देन नदीपासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशातून बेथेल शहरास निघते. 2मग बेथेलापासून लूजास जाऊन अर्की लोकांची सीमा अटारोथ याजवळून गेली. 3पुढे पश्चिमेस यफलेटी लोकांच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेर शहरापर्यंत उतरून गेली; आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता. 4याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शे व एफ्राइम यांना वतन मिळाले. 5एफ्राइमाच्या वंशजांची सीमा त्यांच्या कुळांप्रमाणे अशी पडली की त्यांच्या वतनाची सीमा अटारोथ-अद्दार शहराच्या पूर्वेपासून वरल्या बेथ-होरोना पर्यंत होती. 6आणि ती सीमा मिखमथाथाजवळ समुद्राकडे उत्तर बाजूला गेली, आणि पूर्वेस तानथ-शिलोपर्यंत ती सीमा वळली, मग तेथून पुढे पूर्वेस यानोहा तेथवर गेली. 7नंतर ती यानोहा पासून अटारोथ शहर व नारा नगर येथपर्यंत उतरली, मग यरीहोस मिळून बाहेर यार्देनेस गेली. 8तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन आहे. 9आणि मनश्शेच्या वंशजाच्या वतनापैकी कित्येक नगरे एफ्राइमाच्या वंशजासाठी वेगळी केलेली होती; ती सर्व नगरे व त्यांची गावे होती; 10तथापि जे कनानी गेजेरात राहत होते, त्यांना एफ्राइम्यांनी घालविले नाही; यास्तव ते कनानी एफ्राइमामध्ये आजपर्यंत राहत आहे; आणि नेमून दिलेले काम करण्यास ते दास झाले आहेत.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.