मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

यशया 15

हा अध्याय या भागाचा आहे: Over de volken

1मवाबाबद्दलची घोषणा. खरोखर, एका रात्रीत मवाबाचे आर वैराण आणि नाश करण्यात आले; खरोखर एका रात्रीत मवाबाचे कीर वैराण आणि नाश करण्यात आले. 2दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले; नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे. त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत. 3ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर आणि आपल्या चौकात प्रत्येकजण आक्रोश करीत आहेत, अश्रू गाळीत आहेत 4हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे. यामुळे मवाबाचे शस्त्रधारी माणसे आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव त्यांच्यात थरथरत आहे. 5मवाबाकरता माझे हृदय ओरडते; तिचे शरणार्थी सोअर आणि एगलाथ-शलिशीया येथवर पळून गेले आहेत. लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाईमाच्या वाटेवर त्यांच्या नाशासाठी मोठ्याने आक्रोश करीत आहेत. 6पण निम्रीमाचे पाणी आटले आहे; गवत सुकून गेले आहे आणि नवीन गवत नाहीसे झाले आहे; काहीच हिरवे नाही. 7यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते, वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत. 8मवाबाच्या प्रदेशामध्ये सगळीकडे रडणे चालले आहे; त्यांचा आकांत एग्लाइमापर्यंत आणि बैर-एलीमापर्यंत त्यांचा आक्रोश पोहचला आहे. 9दीमोनाचे पाणी रक्ताने भरले आहेत; पण मी दीमोनावर अधिक जास्त संकटे आणीन. जे मवाबापासून निसटले आहेत आणि जे देशात बाकी आहेत त्यांच्यावर सिंह हल्ला करतील.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.