मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

1 थेस्सलनीकाकरांस 1

हा अध्याय या भागाचा आहे: Terugblik

1देवपिता व प्रभू येशू ख्रिस्ता याच्यात असलेली थेस्सलनीका शहरातील मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो. 2आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो. 3आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेली सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो. 4बंधूंनो, तुम्ही देवाचे प्रिय आहात, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच; 5कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हास कळविण्यात आली तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. 6तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला; 7अशाने मासेदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना तुम्ही उदाहरण असे झाला आहात. 8मासेदोनिया व अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे; इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाची बातमीही सर्वत्र पसरली आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगायची गरज नाही. 9कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळला आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास, 10आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास, तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मरण पावलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.