मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

शोधा

“भाकर” साठी निकाल

इंडियन रीवाइज्ड वर्जन मध्ये २७८ वचने सापडली.

  1. उत्पत्ति 3:19तू माघारी जमिनीमध्ये जाशील तोपर्यंत तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर खाशील, तू मरणाच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. कारण मातीमधून तू निर्माण झालेला आहेस; आणि मातीमध्ये तू परत जाशील.
  2. उत्पत्ति 14:18देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता.
  3. उत्पत्ति 18:6अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”
  4. उत्पत्ति 19:3परंतु लोटाने त्यांना आग्रहाने विनंती केली, म्हणून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी जेवण तयार केले व बेखमीर भाकरी भाजल्या आणि ते जेवले.
  5. उत्पत्ति 21:14अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली.
  6. उत्पत्ति 25:34याकोबाने त्यास भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर उठला व तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला.
  7. उत्पत्ति 27:17तिने स्वतः इसहाकासाठी तयार केलेले रुचकर जेवण आणि भाकर आणून याकोबाच्या हातात दिले.
  8. उत्पत्ति 37:25ते भाकरी खाण्यास खाली बसले. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो पाहा, इश्माएली लोकांचा तांडा मसाल्याचे पदार्थ व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहीत गिलाद प्रदेशाहून येत होता. ते खाली मिसर देशाकडे चालले होते.
  9. उत्पत्ति 40:16स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या.
  10. उत्पत्ति 45:23त्याने आपल्या वडिलासाठीही या देणग्या पाठवल्या: धान्य, भाकरी, आणि इतर पदार्थांनी लादलेल्या दहा गाढवी त्याच्या वडिलाच्या प्रवासासाठी पाठवल्या.
  11. निर्गम 12:8त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून कडू भाजी व बेखमीर भाकरीबरोबर खावे.
  12. निर्गम 12:15सात दिवस बेखमीर भाकर खावी; पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्यास तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे.
  13. निर्गम 12:17या प्रकारे बेखमीर भाकरीच्या सण पाळावा. कारण याच दिवशी मी तुम्हा सर्वांना मिसर देशातून बाहेर काढून आणले. म्हणून हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा.
  14. निर्गम 12:18तेव्हा पहिल्या महिन्यातील चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या.
  15. निर्गम 12:20त्या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तुम्ही घरोघरी बेखमीर भाकरच खावी.”
  16. निर्गम 12:39त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती. त्यांना बेखमीर भाकरीच भाजाव्या लागल्या. त्यांना जबरीने बाहेर काढण्यात आले होते. त्यांना थांबण्यास वेळ नव्हता. तसेच खावयास काही विशेष जेवण करता आले नाही;
  17. निर्गम 13:3मोशे लोकांस म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु या दिवशी परमेश्वराने आपल्या हाताच्या बळाने तुम्हास गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये.
  18. निर्गम 13:6या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी परमेश्वरासाठी तुम्ही हा सण पाळावा;
  19. निर्गम 13:7या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमिराचे दर्शनसुध्दा होऊ नये.
  20. निर्गम 16:8आणि मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल; आणि सकाळी पोटभर भाकरी देईल; कारण तुम्ही परमेश्वराविरूद्ध कुरकुर करीत आहा ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहो? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुध्द नाही तर परमेश्वराविरुध्द आहे.”
  21. निर्गम 16:12“मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हास पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हास समजेल.”
  22. निर्गम 23:15बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यामध्ये सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
  23. निर्गम 23:18तुम्ही यज्ञपशूचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरीसोबत अर्पण करू नये; आणि मला अर्पण केलेल्या यज्ञपशूची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये.
  24. निर्गम 25:30माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर नेहमी ठेवावी.
  25. निर्गम 29:2बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या व तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; या सर्व सपिठाच्या असाव्यात.
  26. निर्गम 29:23त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी
  27. निर्गम 29:32अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी;
  28. निर्गम 29:34समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे;
  29. निर्गम 34:18बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात मिसर देशातून तू बाहेर निघालास.
  30. निर्गम 34:25माझ्या यज्ञबलीचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूचे काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये.
  31. निर्गम 35:13मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर;
  32. निर्गम 39:36मेज, त्यावरील सर्व वस्तू व पवित्र समक्षतेची भाकर;
  33. निर्गम 40:23त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
  34. लेवीय 2:4जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर भाकरीचे किंवा वरून तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे.
  35. लेवीय 2:5जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे.
  36. लेवीय 7:13त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत त्याने खमिर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या
  37. लेवीय 8:2अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन,
  38. लेवीय 8:26परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतील एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या.
  39. लेवीय 8:31मोशे अहरोन व त्याचे पुत्र ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा.
  40. लेवीय 8:32मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका;
  41. लेवीय 23:6त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचा बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर (खमीर न घातलेली भाकर खावी).
  42. लेवीय 23:14तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल, त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर, किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे रहाल तेथे तुमच्याकरिता हा नियम पिढ्यानपिढ्या कायमचा चालू राहील.
  43. लेवीय 23:17त्यादिवशी तुम्ही आपल्या घरातून दोन दशांश एफाभर मैद्याच्या, खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरी ओवाळण्यासाठी आणाव्या; परमेश्वराकरिता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय.
  44. लेवीय 23:20याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी.
  45. लेवीय 24:9ती भाकर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वरास अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्यास परमपवित्र होय.”
  46. लेवीय 26:26मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.
  47. गणना 4:7त्यांनी समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे नेहमीची भाकरही त्यावर ठेवावी.
  48. गणना 6:15त्याने तेलात मळलेल्या मैद्याच्या एक टोपलीभर बेखमीर भाकरीसुद्धा आणाव्या व तेल लावलेले बेखमीर पापड त्याबरोबर त्यांचे अन्नार्पणे व पेयार्पणे आणावीत.
  49. गणना 6:17त्याने बेखमीर भाकरीच्या टोपलीबरोबर, परमेश्वराकरता शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी मेंढा सादर करावा. याजकाने अन्नार्पण व पेयार्पणही सादर करावी.
  50. गणना 6:19नाजीराने आपण वेगळेपणाचे असलेले चिन्ह म्हणजे त्याने डोक्याचे मुंडण केल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजविलेला फरा, टोपलीतून एक बेखमीर भाकर व एक बेखमीर पापड घेऊन त्याच्या हातावर ठेवावी.

पहिली 50 वचने दाखवत आहोत. कमी निकालांसाठी तुमचा शोध अधिक नेमका करा.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.